कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे कित्येक महिने घरात बसल्यानंतर आता कलाकार विरंगुळ्यासाठी व्हेकेशन ट्रीप प्लॅन करत आहेत.
सोशल मीडियावरुन सतत चाहत्यांच्या संपर्कात असणारी प्रसिध्द अभिनेत्री-दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेनेसुध्दा अलिकडेच गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतला आहे.
या व्हेकेशन ट्रीप दरम्यान मृण्मयीने गोव्याच्या किनाऱ्यावर नव्या अवतारात फोटोशूट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्रामवर या व्हेकेशन ट्रीपचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये कलरफुल फ्लॉवर प्रिंटचा क्रॉप टॉप आणि व्हाईट कलरची शॉर्ट पॅंट अशा बोल्ड अंदाजात मृण्मयी पाहायला मिळतेय.
मृण्मयीच्या या जबरदस्त फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.