जन गण मन या आगामी चित्रपटात पूजा हेगडे अभिनेता विजय देवरकोंडासोबत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.या फोटोत पुजाने गोल्डन शेडची अतिशय सुंदर अशी लिनन साडी नेसली आहे.
'राध्ये श्याम' या चित्रपटातून जगभरात आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री पूजा हेगडे सध्या आपल्या आगामी 'जन गण मन' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.
या चित्रपटासाठी पूजा हेगडेने मोठी रक्कम घेतल्याचं समोर आलं आहे. 'जन गण मन' या चित्रपटासाठी पूजाने तब्बल 5 कोटी रुपये घेतले आहेत. यातील पूजाला 4 कोटी आणि उरलेले 1 कोटी रुपये तिच्या स्टाफसाठी दिले जाणार आहेत. पुजा तिच्या लूक बरोबरच कायम तिच्या फॅशन सेन्सची ही चर्चा होत असते. सध्या तिने तिच्या इन्स्टाग्रामवर गोल्डन शेडच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या चित्रपटात पूजा हेगडे जबरदस्त ऍक्शन करताना दिसून येणार आहे. हा चित्रपट तामिळ,तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पूजाचे चाहते तिला ऍक्शन फॉर्ममध्ये पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.काही काळापूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने पहिल्याच चित्रपटात हृतिक रोशनसोबत काम करून आपली नवी आणि वेगळी ओळख निर्माण केली.
पूजाचा फॅनफॉलोइंग देखील जबरदस्त आहे, ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. चाहत्यांनाही तिचे फोटो खूप आवडतात.