अभिनेत्री पूजा हेगडे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय. आता तिनं एक सुंदर फोटोशूट करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
मुंबईत जन्मलेल्या पूजाला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती.
पूजाने 2012मध्ये तामिळ चित्रपट ‘मुगामुडी’द्वारे मोठ्या पडद्यावर आगमन केले. पूजाचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. त्यानंतर तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले.
2016मध्ये आशुतोष गोवारीकरांच्या ‘मोहेंजो दारो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेता हृतिक रोशनसह पूजाने या चित्रपटात आपला अभिनयाचा जलवा दाखवला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नव्हता.
आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नीने एका जाहिरातीत पूजाला पाहिले होते आणि पुढच्या चित्रपटात पूजाला कास्ट करण्याचे सुचवले होते. ‘मोहेंजो दारो’ चित्रपटानंतर पूजा हेगडे ‘हाऊसफुल 4’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकली होती.