‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
पती तीर्थदीप रॉयसोबत सई लोकूर भटकंतीवर आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणारी सई रोज फोटो शेअर करत आपल्या भ्रमंतीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते आहे.
नुकतेच तिने समुद्र किनारी धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
‘सन, सँड अँड मी’ असे कॅप्शन देत सई लोकूरने हे फोटो शेअर केले आहेत.
समुद्र किनारी, वाळूवर हात फिरवणाऱ्या सईच्या मनमोहक अदा तिच्या पतीने म्हणजेच तीर्थदीप रॉयने टिपल्या आहेत.