अभिनेत्री सई ताम्हणकर अभिनयासोबतच फॅशन आणि स्टाईलबाबतही तितकीच सजग आहे. हटके स्टाईल आणि फॅशनमध्ये ती स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
काम, सेटवरील गमतीजमती आणि विविध फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नुकतंच सईनं तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.
लवकरच कलरफुल, मिडियम स्पायसी आणि मिमी या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे.
तिचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.