अभिनेत्री सना खानने नुकतीच मुफ्ती अनस नामक व्यावसायिकाशी लग्न गाठ बांधली आहे. सध्या तिच्या लग्नाचे वेगवेगळे सोहळे सुरू आहेत.
सनाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सनाने परिधान केलेल्या लाल लेहेंग्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
या लाल लेहेंग्याची किमंत 1350 डॉलर अर्थात तब्बल 1 लाख रुपये इतकी आहे. ड्यूपिन क्रेप मटेरीअलच्या या लेहेंग्यावर गोल्डन हेवी जरीकाम करण्यात आले आहे.
सना खानचा निकाह समारंभ सूरतमध्ये पार पडला होता. मुफ्ती अनस नामक व्यावसायिकाशी तिने लग्न केले आहे. अभिनेता एजाज खानने या दोघांची भेट घडवून आणली होती.
एक महिन्यापूर्वी सनाने मनोरंजन विश्वाला ‘अलविदा’ म्हणत असल्याचे जाहीर केले होते. या वृत्ताने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. धर्माच्या मार्गावर पुढचे आयुष्य व्यतित करण्याचा निर्णय तिने घेतला होता.