बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या प्रेग्नंट आहे, ती प्रेगन्सीची हा काळ एंजॉय करताना दिसत आहे. सोनम कपूरने तिचे बेबीबंपसह शूट केलेले फोटो आपल्या चाहत्याच्याबरोबर शेअर केले आहेत .
सोनमने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर वेळोवेळी ती बेबीबंपचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनमने इंस्टाग्रामवर आणखी धमाकेदार फोटो टाकले आहेत.
या फोटोंमध्ये सोनम कपूर काळ्या पारदर्शक ड्रेसमध्ये बेबी बंप दाखवताना दिसत आहे. घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्यासाठी सोनम कपूरच्या दोन्ही घरचे कुटुंबीय अत्यंत उत्सुक आहेत
या फोटोमधून सोनमकपूरच्या चेहऱ्यावरील मातृत्वाचा ग्लो अधिकच उठून दिसत आहे.प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या तीन महिने आपल्यासाठी खूप कठीण काळ असल्याचा खुलासा नुकताच तिने एका मुखाखातीत बोलताना केला होता.