अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. सोनमनने आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त नवऱ्याला शुभेच्छा देणारी खास पोस्ट शेअर केली आहे.
तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सरप्राईज देत माझी अनेक स्वप्ने वइच्छा पूर्ण केल्या आहेत. मी युनिर्व्हसचे खूपखूप आभारी आहे,की तुझ्यासारखा जगातील सर्वात चांगला व्यक्ती माझ्या आयुष्य आला, असे तिने आपल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
सोनमने इंस्टाग्रामवर पती आनंद आहुजा सोबतचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच खास मेसेजही लिहिला आहे. सोनमी कपूर सहा वर्षांपूर्वी अद्योगज आनंद आहुजा सोबत विवाहबंधनात अडकले.
सोनम लवकरच आई बनणार आहे. वेळोवेळी आपल्या प्रेग्नेंसीचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.