Foods for Fatigue: तुम्हाला जाणवतोय थकवा आणि अशक्तपणा ? ‘हे’ पदार्थ खाऊन बघा

| Updated on: Jan 12, 2023 | 12:08 PM

Foods for Fatigue: शरीराला पुरेशी एनर्जी मिळाली नाही तर खूप थकवा जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये दिवसभर एनर्जी हवी असेल तर तुम्ही अनेक पदार्थांचे सेवन करू शकता.

1 / 5
बऱ्याच वेळेस लोकांना काहीही न करता थकवा आल्यासारखं वाटतं. अशा वेळी त्यांना खूप जास्त झोप येते आणि आळसही येतो. हे आहारातून पुरेसे पोषक तत्वं न मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही आहारात अशा पदार्थांचे सेवन करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळू शकेल. आहारात कोणते पदार्थ खाऊ शकता, हे जाणून घेऊया.

2 / 5
केळं - केळ्यामध्ये डाएट्री फायबर, पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचे सेवन तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवत नाही. स्मूदीच्या रूपातही तुम्ही केळ्याचे सेवन करू शकता.

3 / 5
अक्रोड - अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे ओमेगा 3 चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. दिवसभर उत्साही राहण्यासाठी तुम्ही अक्रोडाचे सेवन करू शकता. त्यामुळे थकवा आणि सुस्ती दूर होण्यास मदत होते.

4 / 5
भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर असते. शरीरात या खनिजाची कमतरता असेल तर त्यामुळे थकवाही जाणवतो. म्हणूनच तुम्ही भोपळ्याच्या बियांचेही सेवन करू शकता.

5 / 5
व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ - तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. यामध्ये दूध, अंडी आणि मशरूमसारख्या पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे तुमची ऊर्जा वाढण्यास मदत होईल