गायक-अभिनेता आदित्य नारायण नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. मैत्रीण श्वेता अग्रवालसह त्याने लग्नगाठ बांधली आहे.
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. वधू-वरांच्या वेशात श्वेता आणि आदित्य खूप सुंदर दिसत होते.
आदित्य आणि श्वेता ब्राइडल आऊटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसत होते. दोघांनीही कलर कॉर्डिनेटेड आऊटफिट्स परिधान केले होते. आदित्यने मोती रंगाच्या शेरवानीवर हलक्या गुलाबी रंगाचा शेला परिधान केला होता.
यावेळी श्वेतानेही मोती आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यासह कुंदनचे दागिने तिने घातले होते. भरगच्च दागिन्यांसह श्वेताच्या चेहऱ्यावरील आनंद तिच्या सौंदर्यात भर घालत होता.
गेल्या महिन्यातच आदित्यने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर त्याने आपण लवकरच लग्न करणार असल्याची घोषणादेखील केली होती.
कोरोनामुळे 1 डिसेंबरला पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात केवळ 50 लोक सामील झाले होते आहे. लग्नानंतर 2 डिसेंबरला मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा होणार आहे.