बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आदित्य नारायण आज (1 डिसेंबर) गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आदित्य वरात घेऊन लग्न मंडपाकडे रवाना झाला आहे.
आदित्यच्या मिरवणुकीत त्याचे वडील उदित नारायण आणि आई दीपा यांनी देखील ठेका धरला होता. तसेच, या वरातीत नातेवाईकही धमाल करताना दिसले.
आजचा दिवसही खास आहे, कारण आज आदित्य नारायणचे वडील उदित नारायण यांचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे आदित्य नारायणसाठी हा दिवस अधिक खास बनला आहे.
या विवाह सोहळ्यासाठी आदित्यने खास ऑफ-व्हाइट शेरवानी परिधान केली आहे. तर, हिरव्या रंगाची माळही घातली होती. आदित्यचे सनग्लासेस त्याच्या लूकमध्ये भर घालत आहे.
यापूर्वी आदित्य नारायणने विवाह सोहळ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. ज्यात श्वेता आणि आदित्य एकमेकांसोबत खूपच खुश दिसत होते.
कोरोनामुळे या विवाह सोहळ्यात केवळ 50 लोक सामील होणार आहे. फक्त कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. लग्नानंतर 2 डिसेंबरला मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा होणार आहे.