एकनाथ शिंदेंचं बंड झाल्यापासून आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करत आहेत.
यावेळी ते थेट स्थानिक लेव्हलच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे.
त्यांच्या या दौऱ्याला अनेक जुने शिवसैनिक उपस्थिती लावत आहे.
त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या समोर हजारोंची गर्दी जमत आहे.
या गर्दीला पुन्हा ऊर्जा देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंकडून होतोय.
निष्ठावंत शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचे काम आदित्य ठाकरे यावेळी करत आहेत.
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात होणारी ही तुफान गर्दी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची चिंता वाढवत आहे.
आज आदित्य ठाकरेंनी पुणे आणि सातारा जिल्ह्यातला बराच भाग पिंजून काढला आहे.