AFG vs BAN : अफगाणिस्तानचा खोटेपणा जगासमोर, मॅचमध्ये ‘तो’ खेळाडू मुद्दाम पडला, कारण…

| Updated on: Jun 25, 2024 | 11:15 PM

अफगाणिस्तान संघाने जगभर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तान संघाने धडक मारली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानला संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला. बांगलादेशसोबतच्या सामन्यावेळी असं काय घडलं गुलबदिन नायब अचानत खाला पडला. हा पण एक स्ट्रॅटेजीचा भाग होता. कसा ते जाणून घ्या.

1 / 5
सेंट व्हिन्सेंटच्या अर्नोस व्हॅले या मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेश संघाचा आठ गडी राखून पराभव केला. सोशल मीडियावर अफगाणिस्तानचा खेळाडू गुलबदिन नायब याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राशिद खान ओव्हर टाकत असताना तो अचानक खाली कोसळतो.

2 / 5
कोणालाच काही समजत नाही नक्की काय झालं? कारण गुलबदिन नायब फिल्डिंग करत असताना खोटी हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याचं दाखवतो. त्यामुळे सामना काही वेळ थांबवण्यात येतो.

3 / 5
12 व्या ओव्हरमध्ये पाऊस सुरू होता. तेव्हा डगआउटमध्ये अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी आपल्या खेळाडूंना खेळ स्लो करण्याचा इशारा दिला. कारण त्यावेळी अफगाणिस्तान डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ते 2 धावांनी पुढे होते. म्हणूनच गुलबदिन नायब खोटेपणा करतो.

4 / 5
खराब हवामानामुळे सामना पुन्हा सुरू झाला नसता तर अफगाणिस्तान संघाला विजयी घोषित करण्यात आलं असतं. गुलबदिन नायबच्या या खोट्या दुखापतीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

5 / 5
दरम्यान, अफगाणिस्तान संघ आता सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका संघासोबत भिडणार आहे. अफगाणिस्तान संघाने आफ्रिकेला हरवलं तर ते पहिल्यांदा फायनलमध्ये धडक मारणार आहेत. क्रिकेट विश्वात अफगाणिस्तान संघाचं जोरदार कौतुक होत आहे