प्रसिद्ध चित्रपट निर्माता/दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्याच्या अनेक वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेल्या सफिना हुसैनसोबत नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
दिग्दर्शक हंसल मेहता व सफिना हुसैन यांच्या विवाह या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट करून त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे.
हंसल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की.. 17 वर्षांनंतर, दोन मुलं, आमच्या मुलांना मोठे झालेले पाहून , आम्ही आमच्या स्वप्नांचा पाठलाग करत आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला."
पुढे ते लिहितात "आयुष्यात नेहमीप्रमाणे, हे देखील अचानक आणि अनियोजित होते. मात्र आमचा प्रतिज्ञा खरी होती. शेवटी प्रेम इतर सर्व गोष्टींवर मात करते. आणि ते आहे…
हंसल यांनी पोस्ट केल्या छायाचित्रामध्ये त्यांनी तपकिरी रंगाचा ब्लेझर आणि टी-शर्ट घातलेला आहे. तर गुलाबी सलवार सूटमध्ये सफिना त्यांच्या कुटुंबियांसोबत पोज देताना दिसत आहेत.
एका चित्रात हंसल एका दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना दिसत आहे आणि दुसर्या चित्रात जोडपे त्या दस्तावेजासोबत पोझ देताना दिसत आहेत.
चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज, अनुभव सिन्हा, अभिनेते राजकुमार राव, मनोज बाजपेयी आणि निमिषा सजयन आणि शेफ रणवीर ब्रार यांनी हंसल यांच्या पोस्टवर कमेंट करत अभिनंदन केलेलं आहे