काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि त्यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून ओळख असलेले अहमद पटेल यांचे बुधवारी (25 नोव्हेंबर) रोजाी पहाटे 3.30 वाजता निधन झाले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
त्यांच्या मृत्यूनंतर सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, विविध पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते.
मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण, गीतकार जावेत अख्तर, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे अशा दिग्गजांनी अहमद पटेल यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना "राजीव गांधी यांच्या काळात अहमद पटेल यांनी अत्यंत थोडा काळ सत्तेत घालवला. मात्र, त्याचं मन सत्तेत रमलं नाही. त्यांचं मन संघटना मोठी करण्यात होतं," असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात
उद्धव ठाकरे यांनी अहमद पटेल यांच्याविषयी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. "एकदा मी पटेल यांच्या घरी पोहोचलो होतो, रात्रीचे 12.15 वाजले होते, त्यांच्याकडून फोन करण्यास सांगितले होतं. मी उशिरा फोन केला तेव्हा सांगण्यात आलं की ते झोपले आहेत. तुम्ही रात्री 2 ते 2.30 दरम्यान फोन करा त्यांची अपॉइंटमेंट आहे. तेव्हा मला कळलं की ते कामाच्या बाबतीत किती तत्पर आहेत," अशी अहमद पटेल यांच्याविषयीची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अहमद पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तसेच त्यांना आभिवादन केले.