Marathi News Photo gallery Age difference between Aishwarya Rai and Abhishek Bachchan they worked in 6 films do you know the names
Aishwarya-Abhishek : ऐश्वर्या की अभिषेक मोठं कोण? दोघांच्या वयात किती आहे अंतर ?
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच 2007 साली लग्न झालं. या दोघांनी 6 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, त्यातील एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. ऐश्वर्या-अभिषेकमध्ये वयाचं किती अंतर आहे माहीत आहे का ? दोघांपैकी मोठं कोण ?
1 / 7
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा बराच बोलबाल असतो, मात्र त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याचं करिअर चढ-उतारांनी भरलेलं आहे. पण त्याची पत्नी, सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने तिच्या करिअरमध्ये एकाहून एक सरस, हिट चित्रपट दिलेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात काहीच आलबेल नसल्याच्या, त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा वेगाने फिरत आहेत. ( Photo : Social Media)
2 / 7
जुलै महिन्यात अनंत आणि श्लोका अंबानी यांच्या लग्नादरम्यान संपूर्ण बच्चन परिवाराने एकत्र एंट्री घेतली, पण सूनबाई ऐश्वर्या आणि नात आराध्या त्यांच्यासोबत नव्हत्या. त्या दोघींनी नंतर वेगळी एंट्री घेतली. त्यामुळे तर बच्चन परिवारातील बेबनावाच्या चर्चांना आणखीनच वेग आला.
3 / 7
त्यानंतरही ऐश्वर्याचे अनेक फोटोज, व्हिडीओज समोर आले तिथे तिच्यासोबत फक्त आराध्यात होती. मात्र तेव्हाच अभिषेकचा एक व्हिडीओही समोर आला ज्यामध्ये तो लग्नाची अंगठी फ्लाँट करताना दिसला. मात्र तरीही अभिषेक-ऐश्वर्याच्या संसारातील दुराव्याची चर्चा काही थांबली नाही.
4 / 7
पण, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या वयात किती अंतर आहे, हे तुम्हाला माहित आहे का ? चला जाणून घेऊया. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. अभिषेकचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी झाला.
5 / 7
तर ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी झाला होता आणि ती आता 50 वर्षांची आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याने एकूण 6 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यामध्ये ढाई अक्षर प्रेम के (2000), कुछ ना कहो (2003), उमराव जान (2006), गुरु (2007), सरकार राज (2008), रावण (2010) आणि धूम 2 (2006) या चित्रपटांचा समावेश आहे.
6 / 7
पण 'धूम 2' चित्रपटात तिची जोडी अभिषेकसोबत नव्हे तर हृतिक रोशनसोबत होती. हा चित्रपट रिलीज होताच त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
7 / 7
2006 साली आलेल्या 'धूम2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता.