भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या विजयात कर्णधार अजिंक्य रहाणेचा मोठा वाटा आहे.
कर्णधार म्हणून ‘अजिंक्य’ ठरलेल्या राहणेची पत्नी राधिका धोपावकर-राहणे ही कायमच त्याची प्रेरणा बनली आहे.
अजिंक्य आणि राधिकाची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे.
अजिंक्य आणि राधिका जवळजवळ राहत असल्याने बालपणापासूनच त्यांच्यामध्ये मैत्रीचे बंध होते.
बालपणापासूनच राधिका आणि अजिंक्य कायम एकमेकांसोबत होते.
काळाबरोबरच त्यांचे मैत्रीचे बंध प्रेमात बदलले. राधिका तशी कुटुंबाच्या ओळखीची असली तरी, दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे याची कल्पना त्यांच्या घरच्यांना नव्हती.
मात्र, दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली देत, कुटुंबियांच्या साक्षीने 26 सप्टेंबर 2014 रोजी लग्नगाठ बांधली.
क्रिकेटपटू असण्याबरोबरच अजिंक्य रहाणे ‘कराटे चॅम्पिअन’ देखील आहे. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी ‘ब्लॅक बेल्ट’ पटकवला आहे.
5 ऑक्टोबर 2019 रोजी राधिका आणि अजिंक्य यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. अनेकदा अजिंक्य आपल्या लेकीसोबतचे व्हिडीओ शोषल मीडियावर शेअर करत असतो.