Marathi News Photo gallery Akshay Trutiya 2023 Date Not possible to buy gold on Akshay Tritiya Then buy any one of these items
Akshay Trutiya 2023 : अक्षय तृतीयेला सोनं विकत घेणं शक्य नाही? मग यापैकी कोणतीही एक वस्तू करा खरेदी
या वर्षी 2023 मध्ये अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2023) किंवा आखाजी तीज 22 एप्रिल रोजी येत आहे हिंदू आणि जैन कॅलेंडरनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला ती साजरी केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हिंदू सणांमध्ये अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही सोन्याची खरेदी केली जाते. पण सोन्याव्यतिरिक्त अशा काही वस्तू आहेत ज्या खरेदी केल्यास तुम्हाला फायदा होईल. चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणती खरेदी करणे सर्वात शुभ आहे.