PHOTO | सावळ्या विठ्ठलाची ओढ न्यारी; स्ट्रेचर, व्हील चेअरच्या मदतीने विठुरायाचे दर्शन
सावळया विठोबाला एकदा तरी डोळे भरून रूप पहावे अशी इच्छा मनी बाळगणाऱ्या अवयवांची हालचाल मंदावलेल्या डॉ. राजाराम होमकर यांना विठोबाचे दर्शन घेता आले. (alzheimer patient visited Vitthal temple)
1 / 5
मनात देवाबद्दल भक्ती असेल तर त्याच्या भेटीला तो आपल्याला बोलतावते. कितीजरी अडथळे आले तरी तो आपल्या दर्शनाची आस पूर्ण पूर्ण करतो, असं म्हटलं जातं. असाच प्रसंग विठोबाच्या मंदिरात घडला आहे. सावळया विठोबाला एकदा तरी डोळे भरून रूप पहावे अशी इच्छा मनी बाळगणाऱ्या अवयवांची हालचाल मंदावलेल्या डॉ. राजाराम होमकर यांना विठोबाचे दर्शन घेता आले.
2 / 5
सोलापूर मधील डॉ. राजाराम होमकर यांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला. यामध्ये त्यांना गंभीर इजा झाल्याने त्यांना अल्झायमर हा आजार झाला. या आजारामुळे त्यांच्या अवयवांची हालचाल मंदावली. हालचाल करात येत नसली तरी त्यांच्या मनता विठोबाचे दर्शन घेण्याची खूप इच्छा होती.
3 / 5
मात्र, अशा अवस्थेत जाऊन दर्शन घेणे एक अवघड काम होते. डॉ. राजाराम यांनी आपल्या वडिलांना ही इच्छा सांगितल्यानंतर त्यांनी राजाराम यांना पंढरपुरात दर्शनास आणले. अवयवांची हालचाल नसल्याने त्यांना व्हील चेअरमधून मंदिरात नेणे कठीण होते. पण मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी भक्ताची आणि देवाची भेट घडावी यासाठी स्ट्रेचरसह त्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यास मदत केली.
4 / 5
या सर्व मदतीमुळे डॉ. राजाराम होमकर यांना आजारी असतानाही विठोबाचे सावळे, सुंदर रूप पाहता आहे. त्यांना विठुरायाचे दर्शन घेता आले.
5 / 5
विठुरायाचे सावळे रुप डॉ. होमकर यांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवले आहे. विठोबाचे दर्शन घेतल्यांतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेळगळंच समाधान दिसत असल्याचे डॉ. होमकर यांचे कुटुंबीय सांगतात.