अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सतत नवनवीन फोटोशूट शेअर करत असते.
आता प्राजक्तानं एक डिझायनर साडी परिधानकरुन फोटोशूट केलं आहे.'इश्क़ पर ज़ोर नहीं...'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहे.
कथ्या रंगाच्या या साडीवर खास काम केलं आहे. या भरीव साडीसोबत प्राजक्तानं ऑक्सिडाईज ज्वेलरी कॅरी केली आहे, सोबतच तिनं केसात गुलाबाचं फुलही लावलं आहे.
हा खास लूक तिनं तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी साकारला होता. या लूकमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिचे हे फोटो रिपोस्टसुद्धा करत आहेत.