वरुण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नंबर 1’हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होतोय. या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणी रिलीज करण्यात आली आहेत आणि याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आता सारानं रिल लाईफ पती असलेल्या वरुणबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही लग्नाच्या लूकमध्ये आहेत. सारानं पांढरा गाऊन परिधान केला आहे, तर वरुणनं पांढरा सूट परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये वरुण आणि साराची केमिस्ट्री खूपच गोड दिसत आहे. सोबतच सारानं काही सिंगल फोटोसुद्धा शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. साराच्या या फोटोंवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत.
'कुली नंबर 1' हा सिनेमा येत्या 25 डिसेंबरला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.
या चित्रपटात वरुण आणि सारा व्यतिरिक्त परिश रावल, जॉनी लीवर, राजपाल यादव, जावेद जाफरीसुद्धा प्रमुख भूमिका साकारणार आहेत.