डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू येथे अस्पृश्य समाजात झाला.
आंबेडकरांनी जातीव्यवस्थेला विरोध केला होता आणि जातीवादाच्या जोखडातून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी संघर्ष केला.
भीमराव आंबेडकर यांना बाबासाहेब म्हणूनही ओळखले जाते. बाबासाहेब देशाचे संविधान निर्माते आहेत
भीमरावांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होतं.
बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय होते.
1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आंबेडकरांचा मोठा वाटा होता.