Photo | भिगवणच्या पठ्ठ्याच्या कॅमेराची कमाल, ‘अमूर फाल्कन’ पक्षाचे पाहा खास फोटो…
Follow us on
कॅमेरामन आपल्या कॅमेरात सेलिब्रिटीची सुंदर छबी टिपण्यासाठी नेहमीच गर्दी करत असलेले आपण पाहात असतो. असाच एक अनोखा सेलिब्रिटी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील जलाशयावर आला असल्याचं इंदापुरातील भिगणच्या एका फोटोग्राफरला कळताच त्याने आपल्या कॅमेरात पाहुण्याची अशी काही छबी टिपलीय की ती पाहून त्या छबीवरुन नजर हटत नाहीय….
हा अनोखा सेलिब्रिटी आहे ‘अमूर फाल्कन’ पक्षी… मराठीमध्ये याला ‘अमूर ससाणा’ म्हणतात तर शास्त्रीय भाषेत ‘फाल्को अमुरेनसिस’ असं म्हटलं जातं… भिगवणचा फोटोग्राफर अमोल काळेने या संदर पाहुण्याच्या छबी आपल्या कॅमेरात कैद केल्यात. हे पक्षी आसाम, मणिपूर, मिझोराम त्रिपुरा, बांगलादेश, बंगालचा उपसागर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि अरेबियन समुद्र असा प्रवास करत जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत जात असतात, असं अमोलने सांगितलं.
अमूर फाल्कनचे मूळ निवास मंगोलियामध्ये असून हिवाळ्यात ते दक्षिण आफ्रिकेकडे जाण्यासाठी निघतात. शिकारी पक्षांमध्ये सर्वात लांब स्थंलातर करणारा हा पक्षी आहे. सर्वाधिक म्हणजे बावीस हजार किलोमीटरचा प्रवास करणारा शिकारी पक्षी म्हणून अमूल फाल्कनची इतिहासात नोंद आहे..
हा पक्षी आकाराने छोटा म्हणजेच कबुतरासारखा असतो. नराची वरील बाजू काळसर करड्या रंगाची, तर खालील अंग करडे… मात्र त्याच्या मांड्या आणि शेपटीखालील पिसे लाल रंगाची… उठावदार नारिंगी लालसर रंगाचा डोळ्याभोवतालचा भाग…. मादी काळसर करड्या रंगाची असून अंगावर काळ्या रेषा असतात. मानेच्या मागील बाजूवर सफेदसर केशपुच्छ असते. खालील अंग फिकट लालसर सफेद रंगाचे, छातीच्या वरील भागावर काळे ठिपके असतात.
‘अमर फाल्कन’ या वर्षीच्या प्रवासासाठी निघाला असताना महाराष्ट्रातील असंख्य फोटोग्राफरचे त्याच्या आगमनाकाकडे लक्ष होते. आठ दिवसापूर्वी तो पुण्याजवळील भुशी डॅम येथे आला असल्याचे समजतात पक्षीमित्र असलेले असंख्य फोटोग्राफर या ठिकाणी जमा झाले. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील बर्डगाईड म्हणून काम करणारे अमोल काळे व त्यांची टीम तिथे पोहोचली. या पक्षाचे सुंदर व मनमोहक सौंदर्य टिपण्यासाठी या फोटोग्राफर यांना अक्षरशा: चिखलातून लोळत मार्ग काढावा लागला व अखेर त्यांनी याचे फोटो आपल्या कॅमेरा टिपले.