मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. पण रुग्ण संख्य कमी झाल्यामुळे आज पासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला परवानगी देण्यात आली आहे, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा,कोलकास,सीमांडोह सह जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्यात आली आहेत.
राज्य सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधामध्ये मोठया प्रमाणावर शिथिलता दिल्याने आता अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्या नंतर आज पासून पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोज बंधनकारक करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात सध्या ३० टक्के पॉझीटीव्ही दर आहे. आठवड्याच्या अखेर पॉझीटीव्हीटी दर कमी झाल्यानंतर शाळा महाविद्यालय सुरू करण्यावर विचार केल्या जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाची माहिती.
विदर्भाच काश्मीर म्हणून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळाची ओळख आहे.दरवर्षी राज्यभरातील हजारो पर्यटन इथं भेट देत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निर्बंधामूळे अनेकदा चिखलदरा मधील पर्यटन हे बंद करण्यात आले होते.
त्यातच पर्यटनावर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह असल्याने याचा मोठा फटका या पर्यटन नगरीला बसला.दरम्यान आता पर्यटन सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.