मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड अँड ग्लॅमरस फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.
अमृताचे ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या नव्या लूकवर चाहतेही फिदा झालेले दिसून येत आहेत.
अमृताने वेस्टर्न लूकमधील फोटो शूट करत सोशल मीडियावरील आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी अरे कोई एसी लगाओ , stunning, या सारख्या कमेंट करत तिचे फोटो लाईक्स केले आहेत.
या फोटोमधील अमृताच्या लूक बरोबरच तिने दिलेल्या हॉट पोझ चाहत्यांना घायाळ करत आहे.
मराठी चित्रपट सृष्टीत अमृता खानविलकरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचे स्थान भरभक्कम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचा स्वतंत्र असा चाहता वर्ग निर्माण केला आहे.