अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करतेय.
अमृता उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र ती सुंदर डान्सरसुद्धा आहे. आता तिनं मस्त डान्सिंग अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत.
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.
ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात.
अमृताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.तिचा हा हटके अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.