भारताने पहिला सामना जिंकला यामध्ये फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमि बजावली. रविंद्र जडेजा आमि अश्विन यांनी 17 विकेट घेतल्या. अशातच कुंबळेने स्पिनर्सबाबत एका सल्ला दिला आहे.
भारताकडे आता जडेजा आणि अश्विन टॉप क्लास स्पिनर आहेत. मात्र आणखी एक स्पिनर आता तो कसोटी संघात हवा असल्याचं अनिल कुंबळेंनी म्हटलं आहे.
अनिल कुंबळे ज्या स्पिनरला संघामध्ये स्थान द्यायला हवं म्हणाले तो दुसरा तिसरा कोणी नसून चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आहे.
अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल आहेत जेव्हा शक्य असेल तेव्हा कुलदीपला सामन्यात जाण्याची संधी द्यायला हवी, असं कुंबळे म्हणाले.
दरम्यान, कुलदीपने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती.