मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अंसतरवली ते मुंबई महामोर्चा निघणार आहे.
अंतरवलीतून निघणाऱ्या मोर्चाआधी अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. अंतरवली सराटीच्या मुख्यरस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.
मराठा आंदोलक जिथून बाहेर पडणार आहेत. त्या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे मुंबईकडे निघणार आहेत.
अंतरवली सराटी गावात जाणारी वाहतूक पोलिसांनी बाहेरच्या बाजूने वळवली आहे. मुंबईकडे हा मोर्चा निघण्याआधी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
मनोज जरांगे यांनी काही वेळा आधी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाने सरकारला 7 महिने वेळ दिला. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. मी असेल नसेल विचार जागे ठेवा. 26 तारखेला घरा घरातील मराठा समाजाने मुंबईला यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.