एंटीलिया 2010 मध्ये तयार होते, पण अंबानी कुटुंब एक वर्ष उशीरा राहायला का गेले? याची होती भीती ?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचे आलिशान निवासस्थान एंटीलिया सर्वांना माहिती असेलच..या एंटीलिया हे निवासस्थान जगातले सर्वात महागडे निवासस्थान आहे.या निवासस्थाना संदर्भात एक किस्सा तुम्हाला माहिती आहे का ?
1 / 5
मुंबईच्या अल्टामाऊंट रोडवर असलेला 27 मजल्याचे आलिशान निवासस्थान एंटीलिया हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात महागडे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. या 27 मजली इमारतीची उंची 568 फूट इतकी आहे. यात भारताचे नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे कुटुंब रहाते.
2 / 5
37000 चौरस मीटर पसरलेल्या एंटीलिया निवासस्थान मुंबईतील सर्वात महागड्या परिसरातील दक्षिण मुंबईत वसलेले आहे. या इमारतीत अरबी समुद्र आणि संपूर्ण शहराचा सुंदर नजारा दिसतो. या इमारतीत थिएटरसह सर्व सुविधा आहेत.
3 / 5
एंटीलियाची निर्मिती साल 2006 मध्ये झाली होती आणि साल 2010 मध्ये हे निवासस्थान बांधून तयार झाले होते.या निवासस्थानाला तयार करण्यासाठी 15,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतू तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हे निवासस्थान तयार असूनही अंबानी कुटुंब वर्षभर ( 2011 पर्यंत ) एका भीतीमुळे येथे शिफ्ट झाले नव्हते.
4 / 5
नोव्हेंबर 2010 मध्ये या गगनचुंबी इमारतीची गृहप्रवेश पूजा देखील झाली होती. परंतू अंबानी कुटुंब साल 2011 पर्यंत या इमारतीत शिफ्ट झाले नव्हते. कारण त्यांनी भीती वाटत होती. येथे रहाण्याने त्यांना नुकसान होऊ शकते. त्यानंतर 50 मोठ्या पंडीतांनी या इमारतीची पूजा केली आणि या इमारतील वास्तू दोष दूर केला होता.
5 / 5
एंटीलिया निवासस्थानाचा वास्तू दोष दूर केल्यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये अंबानी कुटुंब या निवासस्थानात शिफ्ट झाले.या इमारतीचे डिझाईन नीता अंबानी यांनी केली आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका मेहता 27 व्या मजल्यावर रहातात. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी देखील या मजल्यावर राहतात.