आपल्या घरातील पारंपारिक व्यावसाय करत सेटल होणारे अनेकजण आहेत. पण काहीजण आपल्या घरातील पारंपारिक व्यावसायाचा त्याग करत वेगळ्या वाटा धुंडाळतात.
अॅपलचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्या लेकीनेही अशीच वेगळी वाट निवडली आहे. इव्ह जॉब्स सध्या दोन हटके क्षेत्रात काम करतेय.
इव्ह जॉब्सने वडील स्टीव्ह जॉब्स यांच्या अरबोंच्या संपत्तीचा त्याग केलाय. ती तिची आवड जपतेय.
इव्ह जॉब्सला घोडेसवारी करायला आवडतं. ती त्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
इव्ह जॉब्सला मॉडेलिंग करायला आवडतं. ती तिची ही आवड जपते.
इव्ह जॉब्स तिचे हटके आणि वेगवेगळ्या स्टाईलच्या कपड्यांमधले फोटो शेअर करत असते.
इव्ह जॉब्सला 2 लाख 80 हजारांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. तिची तिच्या चाहत्यांना आपल्या फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून अपडेट देत असते.
आपल्या वडिलांनी आखून दिलेल्या वाटेवर न चालता इव्हने वेगळी वाट निवडली त्यासाठी तिचं सर्वत्र कौतुक होतं.