स्मरणशक्ती वाढवायची आहे? मग जरूर करा हे उपाय
तुम्हाला कमी वयातच एखादी गोष्ट विसरायला होत आहे का ? वय वाढतं तस माणूस विसरायला लागतो, पण कमी वयात हे होत असेल तर ते गंभीर लक्षम असू शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपायांचा अवलंब करून पहा.
1 / 7
आपलं वय वाढतं तशी आपली स्मरणशक्ती कमी होते. पण कमी वयातच गोष्टी विसरत असाल तर ते गंभीर आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय करू शकता.
2 / 7
दररोज 10 ते 15 मिनिटे मेडिटेशन केल्याने डोकं शांत होतो व मेंदू तीक्ष्ण बनतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा उपाय पूर्वीच्या काळापासून केला जातो.
3 / 7
वजन वाढल्याने केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक असंतुलनही होते. म्हणूनच ॲक्टिव्ह राहून वजन नियंत्रणात ठेवा.
4 / 7
शांत झोपेमुळे मेंदूवर चांगला प्रभाव पडतो. यामुळे वेळेपूर्वीच स्मरणशक्ती कमी होत नाही आणि शरीरात हॅपी हार्मोन्स वाढतात.
5 / 7
अक्रोड, बदाम, हिरव्या पालेभाज्या इत्यादींचे सेवन मेंदूसाठी सर्वोत्तम ठरते. त्यांचा आहारात नियमित समावेश करा.
6 / 7
जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने मेमरी पॉवर कमी होऊ शकते. तसेच ते आरोग्यासाठीही खूप घातक ठरते. यामुळेच गोड कमी खावे.
7 / 7
आहारात ओमेगा-3 फॅटी ॲसिडयुक्त पदार्थांचा समावेश करा. मांसाहारी पदार्थ खात असाल तर मासे जरूर खावेत. तसेच व्हिटॅमिन डी-ची कमतरता निर्माण होऊ देऊ नका.