Photo : सणासुदीत रेल्वेने प्रवास करणार आहात? मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

| Updated on: Oct 15, 2020 | 7:18 PM

लॉकडाऊनंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. रेल्वे प्रवासासाठी खास टिप्स- (planning to travel by train during the festival?)

1 / 7
कोरोनानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आता हळूहळू सगळं पूर्वपदावर येत असून सण-उत्सवही तोंडावर आले आहेत. त्यामुळे अनेकाची गावी जाण्याची तयारी नक्कीच झाली असेल. त्यासाठी रेल्वेनंही आता कंबर कसली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर अनेक स्पेशल रेल्वे चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रेल्वेनेही प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

2 / 7
रेल्वे प्रवासादरम्यान मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करणं बंधनकारक आहे. कुठल्याही प्रवाशाला विना मास्क रेल्वेमध्ये प्रवेश मिळणार नाही. सोबतच सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्यावर भर दिला जाणार आहे.

3 / 7
तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह असाल आणि तरी रेल्वेमध्ये प्रवेश करणार असाल तर सावध राहा. अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका.

4 / 7
रेल्वेच्या नियमांनुसार तुम्हाला कोरोनाची लक्षणं असतील आणि तुम्ही कोरोना टेस्ट केलेली असेल तर रिपोर्टस् आल्या शिवाय तुम्ही प्रवास करू शकणार नाही. अन्यथा कारवाई होऊ शकते.

5 / 7
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

6 / 7
रेल्वेचे नियम न पाळल्यास रेल्वे अधिनियम 1989 च्या 145,153 आणि 154 कलमानुसार कारवाई होणार आहे.

7 / 7
रेल्वेमध्ये घाण केल्यास किंवा रेल्वे घाण होईल असे वागल्यासही कारवाईचा सामना करावा लागणार आहे.