अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. रोज नवनवीन फोटोशूट शेअर करत ती चाहत्यांना घायाळ करत आहे.
आता तिनं या गुलाबी आणि पांढऱ्या डिझायनर गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री हीनानं हा स्पेशल लूक साकारलाय तो म्हणजे स्टार परिवारच्या 'न्यू इयर सेलिब्रेशन'साठी.
स्टार परिवारच्या न्यू इअर 'न्यू इयर सेलिब्रेशन'साठी केलेला हीनाचा हा लूक किलर आहे.
' Brace yourselves, we are commiinngg..' असं कॅप्शन देत तिनं आता चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
हीना चा हा लूक चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस उतरला आहे. या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्स करण्यात येत आहेत.