Photo Gallery : जुनं तेच सोनं, दर वाढीनंतरही राजस्थानी माठची नंदूरबारकरांना भुरळ
नंदूरबार : राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे. काळाच्या ओघात पाणी साठवणूकीमध्ये बदल झाला असला तरी माठ बाजारात दाखल होताच ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. घरोघरी फ्रीज असतानाही नैसर्गिकरित्या थंड पाणी मातीच्या माठातून मिळत असते. एवढेच नाही तर हेच पाणी आरोग्यसाठी पोषक असते म्हणून माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. नंदुरबारच्या बाजारात विविध आकारातील आणि डिझाईन चे माठ विक्री साठी दाखल झाले आहेत. यामध्ये सिरॅमिक माती आणि राजस्थानी माठाला मोठी मागणी आहे. तर पारंपरिक काळ्या मातीचा माठांना मोठी मागणी आहे.