आतापर्यंत टीम इंडियाचा गोलंदाज अश्विनने अनेक चांगल्या फलंदाजांना रणआऊट केले आहे. ज्यावेळी तो गोलंदाजी करत असतो, त्यावेळी अनेकदा खेळाडू पीच सोडून बाहेर जात नाहीत. काल बांगलादेशच्या मॅचविरुद्ध हे सगळं पाहायला मिळालं.
कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली खेळी केल्यामुळे धावसंख्या अधिक झाली होती. परंतु बांगलादेशच्या खेळाडूंनी सुद्धा काल चांगला खेळ केला, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही टीममधला संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळाला.
लिटन दास (Litton Das) या बांगलादेशच्या खेळाडूने सुद्धा चांगली खेळी केली. मैदानात पाऊस झाल्यानंतर काही मॅच थांबण्यात आली होती. त्यानंतर लिटन दास बाद झाला. आश्विन डायरेक्ट थ्रो मारल्यानंतर तो बाद झाला. त्यावेळेचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
ज्यावेळी आश्विन बॉलिंग करीत होता, त्यावेळी बांगलादेशचा खेळाडू लिटन दास चांगली फलंदाजी करीत होता. आश्विन तो इतका घाबरत होता, की त्याने मैदान सोडले नाही.