3.3 सेकंदात 40 किमी वेग पकडणार, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरचं भारतात वितरण सुरु

| Updated on: Apr 13, 2021 | 6:57 AM

अ‍ॅथर एनर्जीने दिल्ली येथे अ‍ॅथर 450 एक्स आणि 450 एक्स सीरिज 1 इलेक्ट्रिक स्कूटरची अधिकृतपणे डिलीव्हरी सुरु केली आहे.

1 / 5
अ‍ॅथर एनर्जीने (Ather Energy) दिल्ली येथे अ‍ॅथर 450 एक्स (Ather 450X) आणि 450 एक्स सीरिज 1 (450X Series 1) इलेक्ट्रिक स्कूटरची अधिकृतपणे डिलीव्हरी सुरु केली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने रविवारी दिल्लीतील ग्राहकांना स्कूटरच्या चाव्या सोपवल्या.

2 / 5
दिल्लीतील पहिली 450x सिरीज 1 स्कूटर नुकतीच सहसंस्थापक तरुण मेहता यांनी हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन मुंजाल यांच्याकडे सोपवली होती. कंपनीच्या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून, कंपनीने अशी घोषणा देखील केली आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणखी 30 शहरांमध्ये कंपनीचा विस्तार केला जाईल.

3 / 5
सध्या, Ather Energy चे संपूर्ण भारतात 11 शहरांमध्ये आठ एक्सपीरियन्स सेंटर्स आहेत. दिल्लीत नवीन डीलरशिप जोडण्याची कंपनीची योजना आहे, पुढील महिन्यात ती सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

4 / 5
इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनीने म्हटलं आहे की, दुसरं एक्सपीरियन्स सेंटर बंगळुरु शहरात सुरु केलं जाईल. या ब्रॅण्डने तमिळनाडूच्या होसूरमध्ये त्यांच्या मोठ्या उत्पादन सुविधेत काम सुरू केले आहे, ज्यामुळे वाढती मागणी पूर्ण करता येईल.

5 / 5
मागील वर्षी, बंगळुरू-स्थित स्टार्ट-अपने भारतीय बाजारात 450X आणि 450 प्लस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली होती. Ather च्या प्रॉडक्ट लाइन अपमध्ये 450 प्लस आणि 450 एक्स असे दोन मॉडेल्स आहेत. 1.47 लाख रुपये किंमतीसह (एक्स-शोरूम, दिल्ली) ही स्कूटर लाँच करण्यात आली आहे. Ather 450X मध्ये 2.9 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक असून जो 8 bhp पॉवर आणि 26 Nm टॉर्क जनरेट करतो.