मराठमोळी अभिनेत्री, निवेदिका कवयित्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
आता तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत एक गोड बातमी प्रेक्षकांना दिली आहे.
'झी 5 प्रिमियम'वर रिलीज झालेली हिंदी फिल्म 'अटकन चटकन'नं दक्षिण लंडन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर हा पुरस्कार जिंकला आहे.
या निमित्त या फिल्ममधील काही फोटो शेअर करत तिनं टीमचं अभिनंदन केलं आहे.
या पोस्टवर तिचे चाहतेसुद्धा कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत.