पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली आहे. या परिष पीएम मोदींनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राला संबोधित केले.
आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी जगातील सर्व देशांना सांगितले की, अ गरीब देश पर्यावरणाचे जास्त नुकसान करतात हा गैरसमज आहे.
G-7 शिखर परिषदेचे पहिले सत्र हवामान, ऊर्जा आणि आरोग्याशी संबंधित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा 1000 वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास की भारताने पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी कधीही कमी पडू दिली नाही.
जगाला आरसा दाखवाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगातील 17 टक्के लोकसंख्या भारतात राहते, मात्र जागतिक कार्बन उत्सर्जनात आपले योगदान केवळ 5 टक्के आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली होय.
ऊर्जा मिळणे हा केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार नसावा, तर गरीब कुटुंबाचाही ऊर्जेवर समान हक्क असायला हवा.आम्ही भारतात घरोघरी एलईडी बल्ब आणि स्वच्छ स्वयंपाकाचा गॅस पोहोचवला आहे. गरिबांसाठी ऊर्जा सुनिश्चित करताना अनेक दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन टाळता येऊ शकते हे दाखवून दिले आहे.असे मोदी यांनी म्हटले आहे
हवामाना प्रती आमची बांधिलकी आमच्या कामगिरीवरून दिसून येते. 9 वर्षांपूर्वी आम्ही 40 टक्के ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य गाठले होते. यासह, आम्ही पाच महिन्यापूर्वीच पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे.
G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीत पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचीही भेट घेतली.
G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचीही भेट घेत , त्यांच्यासोबत चर्चा केली
G7 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांची भेट घेत यांच्यासोबत संवाद साधला
G7 शिखर परिषदेच्या निमित्ताने WTO महासंचालक न्गोझी ओकोन्जो-इवेला यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी संभाषण केले