जगातला सर्वात क्रुर राजा म्हणून पहिले नाव चंगेज खान याचे येते. त्याने तर आपल्या जावयाचा खात्मा केला होता. कारण एवढेच होते की त्याने सासऱ्याविरोधात बंड केले होते. क्रुरतेची पातळी चंगेज खानने तेव्हा ओलांडली जेव्हा त्याने जावयाला तर ठार मारलेच परंतू त्याच्या जातीचा नायनाट केला.त्याने आपल्या कार्यकाळात लाखो लोकांची हत्या केली.
रोमन सम्राट कॅराकल्ला याने 211 ईसवी मध्ये सत्तेसाठी त्याचा भाऊ गेटा याची हत्या केली.सत्तारुढ होण्यास नकार दिल्याने त्याने भावाच्या सर्व समर्थकांनी हत्या केली.त्याने भावाचे तसबीरी आणि त्याचा सर्व नामोनिशानी नष्ट करण्याचा प्रयत्न केला.इतिहासात त्याचे नावच राहु नये याची पुरेपुर काळजी घेतली.
तुर्कीचा सुलतान महमद तृतीय याने तर सत्तेवर येताच आपल्या 19 भावांची आणि अनेक भाच्यांची हत्या केली. त्याकाळात ऑटोमन साम्राज्यात भावांची हत्या करण्याची जणू परंपरा बनली होती.म्हणजे सिंहासनाला कोणताही धोका नको असे प्रत्येक सम्राट विचार करायचा.सत्तेच्या लालसेने महमद तृतीय याने आपल्या रक्ताच्या नात्यांचा नायनाट करण्यात कोणताही संकोच केला नाही.
रशियाचा ईवान चतुर्थ याने तर 1581 मध्य त्याचा मुलगा आणि वारसदार ईवान इवानोविच यालाच संतापाच्या भरात मारुन टाकले. सूनेच्या कपड्यांवरुन ईवान याने टीका केल्याने राग आल्याने मुलगा बापाला भिडला. त्यानंतर रागात येऊन ईवान चतुर्थ याने आपल्या राजदंडाने मुलाच्या डोक्यात प्रहार केला. हा वार इतका वर्मी होता की रक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला.
चीनच्या योंगलचे सम्राट Zhu Di याने सत्ता मिळविण्यासाठी आपल्या भाच्याची हत्या केली.त्याने भाचा जियानवेन सम्राट जीवंत जाळले होते.त्यानंतर भाच्याच्या सर्व समर्थकांची क्रुरपणे खांडोळी केली. योंगल सम्राटाच्या काळात हजारो लोकांना मरणयातना देऊन ठार करण्यात आले होते.