PHOTO | ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंचचे 4 षटकारांसह अनोखे शतक, रोहित-गेलच्या पंक्तीत स्थान
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने (australia captain aaron finch) न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 79 धावांची खेळी केली. फिंचचे हे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरलं.
1 / 6
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 4 षटकार खेचले. यासह फिंचने टी 20 क्रिकेटमध्ये 100 सिक्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला. फिंचच्या नावे 103 सिक्स आहेत.
2 / 6
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे. गुप्टिलने 98 सामन्यातील 94 डावांमध्ये 135 षटकार ठोकले आहेत.
3 / 6
रोहित शर्मा
4 / 6
सर्वाधिक सिक्सच्या बाबतीत इंग्लंडचा आक्रमक फलंदाज इयॉन मॉर्गन तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॉर्गनने आतापर्यंत 97 सामन्यातील 94 डावांमध्ये 113 उत्तुंग सिक्स खेचले आहेत.
5 / 6
मॉर्गननंतर चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो विराजमान आहे. या आक्रमक सलामीवीराने 65 सामन्यातील 62 डावात 107 सिक्स मारले आहेत.
6 / 6
या क्रमवारीत वेस्टइंडिजचा घातक बॅट्समन 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल पाचव्या स्थानावर आहे. गेलने 59 मॅचमधील 55 डावात 106 गगनचुंबी खेचले आहेत.