भारताच्या कोरोना लढ्यात ऑस्ट्रेलियाचं ‘एक पाऊल पुढे’, 13 खेळाडू जमवतायत कोरोनाग्रस्तांसाठी फंड!
'कुणीही सगळं करु शकत नाही, पण प्रत्येकजण थोडं थोडं करु शकतो. याक्षणी भारताची आपली आवश्यकता आहे. युनिसेफच्या वेबसाईटवर जाऊन तिथे आर्थिक मदत करा, असं आवाहन क्रिकेटपटू करत आहेत. (Australian Player Raise Fund To help india Fight Against Covid 19)
1 / 4
ऑस्ट्रेलियाचे पुरुष आणि महिला क्रिकेटपटू कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत आणि त्यांनी आपल्या देशातील लोकांना युनिसेफ ऑस्ट्रेलियाला दान देण्याचे आवाहन केले आहे. युनिसेफ ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर एका मिनिटाच्या व्हिडिओ पोस्टमधून अॅलन बॉर्डरसह ऑस्ट्रेलियन अव्वल खेळाडूंनी भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन जनतेला आवाहन केलं आहे. भारताची सध्याची परिस्थिती विदारक आहे आणि या कठीण काळात आपण सर्वांनी मदत करायला हवी, असं ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जनतेला सांगत आहेत.
2 / 4
अॅलन बॉर्डर, पॅट कमिन्स, ब्रेट ली, अॅलेक्स ब्लॅकवेल, जोश हेझलवुड, मिशेल स्टार्क, माईक हसी, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लबुशेन, अॅलिस पेरी, एलिस्सा हेली, मेग लेनिंग आणि रॅशल हेन्स या खेळाडूंनी भारतातील नागरिकांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियातील जनतेला आवाहन केलं आहे. "भारतात दर सेकंदाला कोरोनाची चार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. भारतात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नाही. ही भारतावर सर्वात कठीण वेळ आली आहे. आपण मदत करायला हवी", असं ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स तेथील जनतेला सांगत आहेत.
3 / 4
'कठीण काळात एकजुटीने राहायला हवं. आम्ही युनिसेफच्या माध्यमातून आमचा पाठिंबा देत आहोत. कोरोनाविरुद्धची टीम अद्याप मैदानात असून गरजूंना आपत्कालीन वस्तू पोहोचवीत आहोत', असं क्रिकेटपटू व्हिडीओमधून सांगत आहेत.
4 / 4
'कुणीही सगळं करु शकत नाही, पण प्रत्येकजण थोडं थोडं करु शकतो. याक्षणी भारताची आपली आवश्यकता आहे. युनिसेफच्या वेबसाईटवर जाऊन तिथे आर्थिक मदत करा, असं आवाहन क्रिकेटपटू करत आहेत.