काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अविका गौर तिच्या ‘फॅट टू फिट’ अवतारामुळे चर्चेत आली होती.
पुन्हा एकदा ‘आनंदी’ फेम अविका गौर एका नव्या कारणाने चर्चेत आली आहे.
अविकाच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे आगमन झाले आहे. ही आनंदाची बातमी तिने चाहत्यांशी शेअर केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अविकाने तिच्या ‘मिस्टर राईट’शी सगळ्यांची भेट घडवून दिली आहे.
‘रोडीज’ फेम मिलिंद चंदवानीला अविका गौर डेट करते आहे.
अविका आणि मिलिंदची भेट एका एनजीओमध्ये झाली होती.
मिलिंदसोबतचा फोटो शेअर करत अविकाने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.