Eating Tips: तुम्हीही फळं खाताना ‘या’ चुका करता का ?

| Updated on: Dec 10, 2022 | 10:56 AM

1 / 5
फळं ही आपल्या शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करतात. त्यामुळे आपल्या शरीराल अनेक फायदे मिळतात. मात्र जर या फळांचे चुकीच्या पद्धतीने सेवन केले तर फायद्याऐवजी नुकसानाला सहन करावे लागू शकते. फळं खाताना कोणत्या चुका करणे टाळावे, ते जाणू घेऊया

2 / 5
फळांचे अतिसेवन : फळं ही आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात हे खरं असलं तरी त्यांचे अतिसेवन शरीरासाठी चांगले नाही. ज्या भाज्यांमध्ये स्टार्च नाही आपण त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करू शकतो, मात्र फळांबाबत तसे करता येत नाही. जास्त फळे खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.  प्रमाणात खाल्ल्या जाऊ शकतात, परंतु फळांसोबत तसे नाही.

3 / 5
रात्रीच्या जेवणानंतर फळे खाणे : रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही लगेच फळं खाल्लीत तर पोटात अन्न कुजण्यास सुरुवात होते. या चुकीमुळे अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर फळं खावीत.

4 / 5
फळांचा रस पिणे : अनेक लोक फळं खाण्यापेक्षा त्यांचा रस पिणे पसंत करतात आणि ते आरोग्यदायी मानतात. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार,  फळं स्वच्छ धुवून ती कापून थेटं खाणं अधिक फायदेशीर आहे. फळे चिरून अथवा कापून खाल्ल्याने फायबर मिळते, ज्यामुळे पोट निरोगी राहते.

5 / 5
फळं कापून खाणे : फळं कापून ठेवणे आणि बऱ्याच वेळानंतर त्याचे सेवन करणे हेदेखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फळे कापून बाहेर नेली आणि उशीरा खाल्ली तर नुकसान होते. कारण अशा परिस्थितीमध्ये वाईट बॅक्टेरिया वाढू लागतात.