बाबा का ढाबा ते राणू मंडल; ‘ही’ सामान्य माणसं एका रात्रीत स्टार झाली
सोशल मीडियाच्या जगात कोण कधी फेमस होईल, हे सांगता येणार नाही. कधी कोणाचा व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होईल याचा पत्ता नाही. सध्या 'बाबा का ढाबा'ची देशभरात चर्चा आहे.
1 / 7
बाबा का ढाबा : सोशल मीडियाच्या जगात कोण कधी फेमस होईल, हे सांगता येणार नाही. कधी कोणाचा व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होईल याचा पत्ता नाही. सध्या 'बाबा का ढाबा'ची देशभरात चर्चा आहे. मटार पनीरसोबत पराठे विकणाऱ्या या बाबाच्या दुकानाबाहेर जत्रा भरत आहे. सोशल मीडियामुळे कोण रारोरात स्टार होईल, हे सांगणे जरी कठीण असले तरी फेमस झालेल्या या लोकांचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदलतं. सध्या हे ढाबावाले बाबा चर्चेत आहेत. परंतु सोशल मीडियामुळे फेमस होणारे ते काही पहिले नाहीत. यापूर्वीही असे अनेक लोक सोशल मीडियामुळे फेमस झाले आहेत.
2 / 7
डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव : वरातीत नाचणाऱ्यांची एक वेगळीच डान्स स्टाईल भारतात फेमस आहे. परंतु डान्सिंग अंकल म्हणून फेमस असलेल्या संजीव श्रीवास्तव यांनी एक वेगळाच परफॉर्मन्स करुन लोकांचं लक्ष स्वतःकडे वळवलं होतं. लग्नातल्या संगीत कार्यक्रमात त्यांनी अभिनेता गोविंदाच्या एका गाण्यावर डान्स केला होता. त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होऊन संजीव श्रीवास्तव एका रात्रीत स्टार झाले. त्यानंतर त्यांना दस्तुरखुद्द गोविंदासोबत नाचण्याची संधीदेखील मिळाली.
3 / 7
पाकिस्तानी चहावाला अरशद खान : पाकिस्तानमधील चहा विकणारा हा तरुणदेखील सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झाला होता. अरशद खान अस त्याचं नाव आहे. अरशद त्याच्या हॅण्डसम लुक्समुळे आणि आकर्षक डोळ्यांमुळे सोशल मीडियावर फेमस झाला होता. लोक त्याला मॉडेल म्हणू लागले होते.
4 / 7
पॅराग्लायडिंग करणारा विपिन साहू : हा फोटो पाहून सर्वजण या तरुणाला ओळखतील. पॅराग्लायडिंग करतानाचा विपिनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमुळे तो लोकांचा चर्चेचा विषय बनला होता. पॅराग्लायडिंग करताना तो घाबरला होता. त्यामुळे तो त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला म्हणत होता की, 'भाई 100-200 रुपये ज्यादा ले ले लेकीन मुझे निचे उतार दे'. या व्हिडीओमुळे विपिनवर मिम्सदेखील बनू लागले होते.
5 / 7
प्रिया प्रकाश वेरियर : एखादी व्यक्ती डोळा मारून फेमस होऊ शकते असं कोणाला वाटेल? परंतु सोशल मीडियामुळे असं झालं आहे. प्रिया प्रकाश वेरियर नावाची ही तरुणी तिच्या केवळ 25 सेकंदांच्या व्हिडीओमुळे प्रसिद्ध झाली होती. त्या व्हिडीओत तिने ज्या अंदाजात डोळा मारला होता, ते पाहून अनेक तरुण तिचे फॅन्स झाले.
6 / 7
ढिंच्याक पूजा : तुम्हाला ही तरुणी आवडत असो वा नसो, परंतु ही तरुणी तिच्या आगळ्यावेगळ्या गाण्यांमुळे फेमस आहे. तिचं 'सेल्फी मैं ने ले ली आज' हे गाणं युट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर खूप व्हायरल झालं होतं.
7 / 7
राणू मंडल: आपल्या सूमधुर आवाजाने लोकांचं मन जिंकणाऱ्या राणू मंडल हिचं आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कधीकाळी रेल्वेस्टेशनवर गाणं गाणारी राणू मंडल तिच्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या गाण्यामुळे प्रसिद्ध झाली होती. गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याच्यासोबत तिला गाण्याची संधीदेखील मिळाली.