कंगना रनौतनं आगामी सिनेमा 'थलायवी'साठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण हैदराबादमध्ये झालं आहे.
या चित्रपटासाठी कंगनानं तब्बल 20 किलो वजन वाढवलं होतं. मात्र चित्रीकरण पूर्ण होताच तिनं वजन कमीसुद्धा केलं आहे.
आता कंगनानं वजन कमीकरुन स्वत:ला फिट बनवलं आहे. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रवास शेअर केला आहे.
तिचा हा प्रवास बघून चाहत्यांनी तिची प्रशंसा केली. या पोस्टसोबतच कंगनानं तिला आलेला अनुभवसुद्धा शेअर केला आहे.
यावेळी कंगनानं भरपूर फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये एका फोटोत ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या वेशात आहे. तर एका फोटोमध्ये ती भरतनाट्यम करताना दिसत आहे.
सोबतच तिनं वर्कआऊट करतानाचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला होता.