PHOTO | अमित शाहांच्या वक्तव्यावर बांग्लादेश भडकला, शाहांना ज्ञान कमी असल्याचं वक्तव्य
अमित शाह म्हणाले होते की, बांग्लादेशचे गरीब लोक भारतात यासाठी येतात कारण त्यांना त्यांच्या देशात पर्याप्त भोजन मिळत नाही (Bangladesh Foreign Minister AK Abdul Memon Reaction)
1 / 8
बांग्लादेशने बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, बांग्लादेशचे गरीब लोक भारतात यासाठी येतात कारण त्यांना त्यांच्या देशात पर्याप्त भोजन मिळत नाही. या वक्तव्यावर आता बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री ए के अब्दुल मोमेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2 / 8
मोमेन म्हणाले, अमित शाह यांची बांग्लादेशबाबतची माहिती मर्यादित आहे. जेव्हा बांग्लादेश आणि भारताचे संबंध इतके पक्के असताना या प्रकारचं वक्तव्य करणे स्विकार्य नाही. अशा वक्तव्यांनी चुकीचा समज होऊ शकतो.
3 / 8
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
4 / 8
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
5 / 8
मोमेन यांनी हे स्विकारलं की बांग्लादेशात शिक्षित लोकांसाटी नोकरींची कमतरता आहे. पण, अशिक्षित लोकांवरही उपासमारीची वेळ आलेली नाही. भारताचे एक लाखापेक्षा जास्त लोक बांग्लादेशात काम करतात. आम्हाला भारतात जाण्याची गरज नाही.
6 / 8
अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत बांग्लादेशने आक्षेप घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. नागरिकता संशोधन कायदा पास झाल्यावर संसदेत अमित शाह यांनी बांग्लादेशचा उल्लेख केला होता. अमित शाह म्हणाले होते बांग्लादेश, अफगानिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे भारतात अशा लोकांना नागरिकता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या दरम्यान अमित शाह यांनी बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यकांसोबत घडलेल्या काही घटनांचाही उल्लेख केला होता.
7 / 8
मोमेन यांनी अमित शाह यांच्या या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हमाले होते, जगात निवडक असे देश आहेत ज्यांच्यासोबत बांग्लादेशसारखं चांगलं सांप्रदायिक सुसंवाद आहे. जर अमित शाह बांग्लादेशात येऊन काही महिने राहातील तर त्यांना हे नक्की कळेल.
8 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी