छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आधारित, महानाट्य ‘जाणता राजा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

| Updated on: Mar 16, 2023 | 2:53 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आधारित, महानाट्य 'जाणता राजा' पुन्हा एकदा आपल्या भेटीला आला आहे. ८० फूट लांब आणि ४० फूट रुंद असलेल्या प्रशस्त रंगमंचावर, घोडे आणि २०० कलाकारांसह मराठेशाहीचा सुवर्णकाळ रसिक प्रेक्षकांना शिवतिर्थावर अनुभवायला मिळण आहे.

1 / 5
मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे आणि सौ. शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते माता तुळजाभवानीची आरती करत 'जाणता राजा' या महानाट्याच्या दुसऱ्या प्रयोगाला सुरुवात झाली. त्यावेळी आशिष शेलार सुध्दा उपस्थित होते.

2 / 5
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणताराजा या महानाट्यातून शिवकाळ जीवंत केला. हे महानाट्य पाहताना आपण शिवकाळात जगत असल्याचा अनुभव येतो. हे महानाट्य पाहायला मिळणे ही सर्वांसाठी एक पर्वणीच आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील नाट्यप्रयोगावेळी केले आहे.

3 / 5
नाट्य परंपरेमधील अजरामर असे महानाट्य "जाणता राजा."  शिवतीर्थावरील पहिला प्रयोग झाला, त्यानंतर त्याची चर्चा अधिक झाली होती.

4 / 5
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या रूपाने सर्व मुंबईकरांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील थरारकपणाचा विलोभनीय अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. आजच्या या पहिल्या प्रयोगाला प्रेक्षकांनी तुफान गर्दी करत महाराजांवरील प्रेमाची अनुभूती दिली.

5 / 5
जाणता राजा खेळ मुंबईमध्ये, खूप अभिमानास्पद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यभिषेक सोहळा, हे सगळं करत असताना चेहऱ्यावरचा आनंद खूप भारी आणि धमाल. १४ मार्च ते १९ मार्च पर्यंत प्रयोग होणार आहेत