IND vs ENG | रोहित कॅप्टन म्हणून टीमसाठी जे यश मिळवतोय, मला काही आश्चर्य नाही, गांगुली असं का म्हणाला?

| Updated on: Feb 29, 2024 | 8:19 PM

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेत रोहित अंँड कंपनीने आता विजय आघाडी घेतली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-1 ने टीम इंडियाने सरशी साधत मालिका खिशात घातली आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली संघाने आतापर्यंत युवा खेळाडूंना हाताशी धरत मालिका जिंकवून दिली आहे. अशातच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने रोहितच्या निवडीवर भाष्य केलं आहे.

1 / 5
रोहित शर्मा याला कॅप्टन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी सौरव गांगुली हा बीसीसीआयचा अध्यक्ष होता. दादाने रोहित याची प्रथम टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड केली होती. त्यानंतर रोहित सर्व फॉमॅटमध्ये कॅप्टन झाला. त्यावेळी विराटला कर्णधारपदावरून काढण्यात गांगुलीचा हात असल्याचं बोललं जात होता.

2 / 5
टीम इंडियाने इंग्लंड संघाला पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. यावर बोलताना, रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जे यशा मिळवत आहे त्याचं मला आश्चर्य वाटत नसल्याचं गांगुलीने म्हटलं आहे.

3 / 5
मी रोहित शर्मा याची निवड करताना त्यामध्ये मला प्रतिभा दिसली होती. आतापर्यंत रोहितने जे  काही यश मिळवलं आहे ते पाहता मला काही आश्चर्य वाटत नाही. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत रोहितने युवा क्रिकेटपटूंसोबत ज्या प्रकारे पुनरागमन केलं त्याचं सर्वत्र कौतुक होत असल्याचं गांगुली म्हणाला.

4 / 5
विराट कोहली, मोहम्मद शमी यासारखी मोठी नावे इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत नाहीत. तर केएल राहुल पहिल्या कसोटीतच जखमी झाला आणि तो बाहेर पडला. जसप्रीत बुमराहलाही कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. रवींद्र जडेजाही दुखापतीमुळे कसोटी सामना खेळू शकला नाही. तरीही रोहितने युवा खेळाडूंच्या साथीने मालिका आपल्या नावावर केली आहे.

5 / 5
दरम्यान, रोहितच्या नेतृत्त्वाखाली आयसीसी T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत आणि आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही टीम इंडियाने प्रवेश केलेला. मात्र विजेतेपद जिंकण्यात यशस्वी  ठरला नाही.