उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण तुम्हाला माहितीये का? जर तुम्ही उन्हाळ्यात पुदिन्याच्या पानाचे सेवन केले तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.
उन्हाळ्यात पुदिन्याची पाने चावण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात असलेले पोषकतत्त्व शरीराला थंड करतात. तसेच पचनक्रियाही सुधारते.
दररोज ५-६ पुदिन्याची पाने चावल्याने चरबी कमी होते. त्वचा निरोगी राहते.
उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. अनेकजण उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी आवडीने खातात.
त्यात प्रथिने, मेन्थॉल, व्हिटॅमिन ए, तांबे, कार्बोहायड्रेट्स सारखे पोषक घटक असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यात ५ ते ६ पुदिन्याची पाने चावून खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
पुदिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. दररोज पुदिन्याची पाने चावल्याने चरबी कमी होते.
पुदिन्यामध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
जर तुम्ही पुदिन्याची पाने चावली तर पचनाच्या समस्या दूर होऊ शकतात. यामुळे अपचन आणि आम्लपित्तच्या समस्यांपासून आराम मिळतो.
पुदिन्याची पाने सकाळी धुवून चांगली चावून खावीत. ती चावल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा.