बापरे! एक महिला एक दोन दिवस नाहीतर तब्बल 500 दिवस राहिली गुहेत, काय आहे कारणं?

| Updated on: Apr 18, 2023 | 9:23 PM

तुम्ही कधी एकटे जंगलात किंवा एखाद्या गुहेत राहिला आहात का. नक्कीच अशा भितीदायक ठिकाणी एकटं राहण्याची हिम्मत तुम्हीच काय कोणीच करू शकणार नाही. पण तुम्हाला माहितीये का एक अशी महिला आहे जी चक्क एका गुहेत एक दोन दिवस नव्हे तर तब्बल 500 दिवस एकटी राहिली आहे

1 / 5
तुम्ही कधी एकटे जंगलात किंवा एखाद्या गुहेत राहिला आहात का. नक्कीच अशा भितीदायक ठिकाणी एकटं राहण्याची हिम्मत तुम्हीच काय कोणीच करू शकणार नाही. पण तुम्हाला माहितीये का एक अशी महिला आहे जी चक्क एका गुहेत एक दोन दिवस नव्हे तर तब्बल 500 दिवस एकटी राहिली आहे. त्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे.

2 / 5
सध्याच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी व्यक्ती तब्बल 500 दिवस जगापासून दूर राहू शकते. याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. पण हा पराक्रम एका महिला स्पॅनिश खेळाडूने केला आहे. हा पराक्रम करणाऱ्या या 50 वर्षीय अॅथलीटिक्सचं नाव बिएट्रिज फ्लेमिनी आहे. बिएट्रिज फ्लेमिनी या स्पेनमधील ग्रॅनाडा येथील गुहेत 500 दिवस एकट्या राहिल्या आहेत. तसंच आता त्या गुहेतून बाहेर आल्या असून  सध्या त्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली आहेत.  तसंच त्यांची ही कामगिरी विश्वविक्रमासाठी पाठवण्यात आली आहे.

3 / 5
बिएट्रिज यांनी गुहेतील त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं.  त्या म्हणाल्या की, माझ्यावर एक वेळ अशी आली होती जेव्हा मी गुहेतले दिवस मोजणे बंद केले होते. तसंच माझ्यावर मधभाश्यांनी हल्ला केला होता. मधमाश्यांनी हल्ला केल्यानंतरचा काळ गुहेतील सर्वात कठीण काळ होता. गेल्या 500 दिवसांपासून मी फक्त पाणी प्यायले आहे. आता मला आंघोळ करायची आहे, पण शास्त्रज्ञांनी मला तसं करण्यास मनाई केली आहे.

4 / 5
गुहेतून बाहेर आल्यानंतर, बिएट्रिजने सगळ्यात आधी तिच्या नातेवाईकांना आणि सपोर्ट टीमला मिठी मारली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, जग बदललं आहे, जेव्हा मी 21 नोव्हेंबर 2021 रोजी गुहेत गेले होते, तेव्हा तेथे अशा फारशा गोष्टी नव्हत्या ज्या आता आहेत. तसंच सध्या शास्त्रज्ञ बिएट्रिजवर लक्ष ठेवून आहेत. 

5 / 5
आत्तापर्यंत जास्तीत जास्त दिवस गुहेत राहिल्याचा विक्रम ३३ चिली आणि बोलिव्हियन खाण कामगारांच्या नावावर आहे. या कामगारांनी कॉपर गोल्ड खाणीत 69 दिवस घालवले. त्यानंतर  2010 मध्ये खाण कोसळल्यानंतर हे मजूर तेथेच अडकले होते